BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

संभाजीनगर बस स्थानक' फलकावर 'कोल्हापूर' नावाचा समावेश करा; 'शहरभान'ची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी):

येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या संभाजीनगर एस. टी. बस स्थानकाच्या मुख्य नामफलकावर 'कोल्हापूर' शहराचे नाव लिहायचे राहून गेले असून, यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हा फलक दुरुस्त करून त्यावर शहराचा उल्लेख करावा, अशी मागणी 'शहरभान' सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात 'शहरभान'च्या वतीने संभाजीनगर आगार व्यवस्थापक यांना मंगळवार, ४ मार्च रोजी निवेदन देण्यात आले.


कोणत्याही शहरात जेव्हा बाहेरचे प्रवासी बस स्थानकावर पोहोचतात, तेव्हा तेथील मुख्य नामफलकावरून आपल्याला आपण योग्य ठिकाणी पोहोचल्याची खात्री पटते. मात्र, कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकाच्या फलकावर केवळ 'संभाजीनगर बस स्थानक' असाच मोठा उल्लेख आहे. राज्यामध्ये 'छत्रपती संभाजीनगर' (पूर्वीचे औरंगाबाद) हे स्वतंत्र शहर असल्याने, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या मनात आपण नक्की कोल्हापुरातच पोहोचलो आहोत का, असा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.


'शहरभान'ने निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी या फलकावर किंवा त्याच्या खालच्या बाजूस 'कोल्हापूर' असा शहराचा ठळक उल्लेख करणे तांत्रिकदृष्ट्या आणि माहितीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. ही बाब आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने