BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाची उत्साहात सुरुवात

कोल्हापूर : घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड येथे राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कंपनीचे व्हाइस प्रेसिडंट श्री. विहंग जोशी यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कर्मचारी , कामगार यांनी औद्योगिक सुरक्षिततेची शपथ घेतली.



यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. “सुरक्षा प्रथम” या ब्रीदवाक्याचा अवलंब करून अपघातमुक्त कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात सुरक्षा जनजागृती रॅली, पोस्टर स्पर्धा, अग्निशमन प्रात्यक्षिके, तसेच कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण सत्रांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे कार्यस्थळी संभाव्य धोके ओळखणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे यावर भर देण्यात येणार आहे.

कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सुरक्षित, निरोगी आणि अपघातमुक्त कार्यपरिसर राखण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

थोडे नवीन जरा जुने