BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

छत्रपती शिवाजी जलतरणची शुल्कवाढ केल्यास युवासेना पोहणाऱ्यांना देणार फुकट प्रवेश

 

कोल्हापूर

धाकधुकीच्या जीवनात ताणतणाव टाळण्याकरता लोकांचा व्यायामाकडे कल वाढलेला आहे. फिरायला जाणे नियमित पोहायला जाणे यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. त्याच अनुषंगाने आज युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील क्रीडा संकुल येथे जलतरण तलावाची वाढीव होणाऱ्या शुल्कवाढसाठी आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरामध्ये महापालिकेचे अंबाई जलतरण तलाव,  रमणमळा हे दोनच जलतरण तलाव आहेत. मात्र अंबाई जलतरण तलाव लोकप्रतिनिधीच्या व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गेली कित्येक वर्ष दुरुस्ती व निधी अभावी बंद आहे.त्यामुळे राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी तलाव हा एकच तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला आहे.


मात्र प्रशासनाच्या काही धोरणांमुळे व काही  झारीतील शुक्राचार्यांच्यामुळे सदरच्या जलतरण तलावाचा खाजगीकरणाचा डाव मध्यंतरी हाणून पाडला होता.मात्र सध्या जलतरण तलावाच्या रोजच्या शुल्काची अथवा मासिक वार्षिक शुल्काची जबर वाढ करण्याचे प्रशासनाने आयोजिले असल्याचा आरोप युवासेनच्या वतीने करण्यात आलाय.

यावेळी कुठल्याही प्रकारची शुल्कवाढ ही छत्रपती शिवाजी जलतरण तलावाबाबत करू नये याचे निवेदन क्रीडा तालुका अधिकारी सुधाकर जमादार यांना युवासेनच्या वतीने देण्यात आले.

तसेच कुठल्याही  प्रकारची शुल्कवाढ  ही छत्रपती शिवाजी जलतरण तलावाबाबत झाल्यास कोणतेही शुल्क न भरता जनतेला रोज फुकट पोहायला सोडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.काहीही झाले तरी ही फि वाढ आम्ही होऊ देणार नाही नसल्याचं ही युवा सेनेच्या सांगण्यात आले.

यावेळी मनजीत माने, चैतन्य देशपांडे, सानिका दानुगडे, अक्षय मोरे, ऋषी जोशी,मयुरेश मिर्डीकर ,शुभम पाटील  यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने