BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कागलच्या कलाकारांनी जिंकली कोल्हापूरकरांची मने

शिव महोत्सव २०२६ - विशेष बातमी | न्यूज़ कट्टा
डी. आर. माने कॉलेज परफॉर्मन्स
सांस्कृतिक विशेष

शिव महोत्सवात रंगला डी. आर. माने कॉलेजचा 'देवीचा जागर'; कागलच्या कलाकारांनी जिंकली कोल्हापूरकरांची मने

कोल्हापूर | २९ मार्च २०२६

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित 'शिव महोत्सव २०२६' मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले, मात्र कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने सादर केलेला 'देवीचा जागर' हा या सोहळ्याचा खऱ्या अर्थाने 'शो-स्टॉपर' ठरला. पूर्ण क्षमतेने आणि कमालीच्या ऊर्जेने सादर केलेल्या या परफॉर्मन्सने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने आपल्या शिस्तबद्ध हालचालींनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. देवीच्या आराधनेतील तोच जोम आणि भक्तीचा आविष्कार या सादरीकरणात पाहायला मिळाला. कोरिओग्राफर शुभम सोनुले यांच्या कल्पक दिग्दर्शनाने या मैफलीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

सहभागी कलाकार :

विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरांगी सारंगळे, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.

या संपूर्ण संचाला योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी या सादरीकरणाला उभे राहून दाद दिली. केवळ करमणूक नाही, तर लोककलेचा वारसा इतक्या प्रखरतेने जपल्याबद्दल हा ग्रुप अभिनंदनास पात्र असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

मार्गदर्शक: नितेश साठे,योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम
थोडे नवीन जरा जुने