BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात २१ वा 'शिव महोत्सव' उत्साहात संपन्न; डॉ. संजय डी. पाटील यांना 'शिवगौरव' पुरस्कार प्रदान

शिव महोत्सव २०२६ - कोल्हापूर

कोल्हापुरात २१ वा 'शिव महोत्सव' उत्साहात संपन्न; डॉ. संजय डी. पाटील यांना 'शिवगौरव' पुरस्कार प्रदान

कोल्हापूर | मार्च २०२६

शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित २१ व्या वर्षाचा 'शिव महोत्सव २०२६' राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात सामाजिक प्रबोधन, पुरस्कार वितरण आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा अविष्कार पाहायला मिळाला. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते 'शिवगौरव' पुरस्काराने, तर नगरसेवक भरत लाटकर यांना 'शिवसेवा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अन्य २० मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील यांनी तरुणांना भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेपासून दूर राहून समाजकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. नगरसेवक भरत लाटकर यांनीही राष्ट्रसेवेसाठी युवकांनी वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात 'सार्थक क्रिएशन्स' प्रस्तुत 'लोककलेचा जागर' आणि डी. आर. माने कॉलेज ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 'देवीचा जागर' या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे आणि अबोली गिऱ्हे यांच्या पहाडी आवाजातील गाण्यांमुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

प्रमुख उपस्थिती:
निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, नगरसेवक आदिल फरास, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्रा. रघुनाथ ढमकले, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, डॉ. सरदार जाधव, डॉ. प्रवीण कोडोलीकर, योगिता कोडोलीकर, विश्वजित वाडकर, नितेश गणेशाचार्य, अक्षय मोरे आणि डॉ. कपिल राजहंस.

कृती समितीचे अध्यक्ष मंजीत माने यांनी मनोगत व्यक्त केले, तर उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी स्वागत आणि सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले.

थोडे नवीन जरा जुने