BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

राजेश चषक फुटबॉल: पाटाकडील तालीम मंडळाची दिलबहारवर मात; ट्रायब्रेकरमध्ये ४-३ ने मिळवला विजय

 कोल्हापूर: जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आणि भगिनी मंच यांच्या वतीने आयोजित 'राज्यस्तरीय राजेश चषक फुटबॉल' स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळाने (PTM) अत्यंत चुरशीच्या लढतीत दिलबहार तालीम मंडळाचा ट्रायब्रेकरमध्ये ४-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल नोंदवता न आल्याने सामन्याचा निकाल ट्रायब्रेकरद्वारे लावण्यात आला. या संपूर्ण सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाचा गोलकीपर अमर गवळी याने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, त्याला या सामन्याचा 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.


सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. पाटाकडील तालीम मंडळाकडून ऋषिकेश मेथे, ओंकार मोरे, अमीन काझीर आणि रोमारियो यांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, मात्र दिलबहारच्या भक्कम बचावफळीमुळे त्यांना यश आले नाही. पाटाकडीलकडून आमिन काझीर, ऋषी मेथे, ओमकार मोरे, नबी खान आणि अक्षय पायमल यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दुसरीकडे, दिलबहार तालीम मंडळाकडून स्वयम साळोखे आणि थांजलिन यांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या, मात्र त्यांचे प्रयत्न थोडक्यात हुकले. दिलबहारच्या वतीने प्रथमेश भोसले, फेबिन, थांजलिन, स्वयम साळोखे, संकेत वेसनेकर आणि माणिक पाटील यांनी लक्षवेधी खेळ केला.

निर्धारित वेळ संपली तेव्हा दोन्ही संघ शून्य गोलवर बरोबरीत होते. त्यानंतर झालेल्या ट्रायब्रेकरमध्ये पाटाकडील तालीम मंडळाकडून अरबाज पेंढारी, रोहित पवार, रोहित मंडलिक आणि अक्षय पायमल यांनी अचूक गोल डागले, तर प्रथमेश हेरेकरची संधी वाया गेली. दिलबहार तालीम मंडळाकडून फेबिन, थांजलिन आणि सतेज साळोखे यांनी गोल केले, मात्र प्रथमेश भोसले आणि सनी सनगर यांना गोल करण्यात अपयश आले. अखेर पाटाकडीलने ४-३ अशा फरकाने हा सामना जिंकून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

थोडे नवीन जरा जुने