BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

शिवाजी तरुण मंडळ 'राजेश चषक'च्या अंतिम फेरीत; खंडोबा तालीम पराभूत

 कोल्हापूर:


राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता विजेतेपदासाठी शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ 'अ' यांच्यात लढत होईल.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतला. खेळाच्या ६ व्या मिनिटाला शिवाजी मंडळाच्या हर्ष जरगने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात ७५ व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरे याने मैदानी गोल नोंदवत शिवाजी मंडळाची आघाडी २-० अशी भक्कम केली.

खंडोबा तालीम मंडळाकडून गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. ८० व्या मिनिटाला कुणाल दळवीने गोल करत खंडोबाचे खाते उघडले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून चढाया झाल्या, मात्र शिवाजी मंडळाने आपली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत विजय मिळवला.

शिवाजी मंडळाकडून एस. जांभळे, संकेत साळोखे, राज अली, योगेश कदम, इंद्रजीत चौगुले, दर्शन पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर खंडोबाकडून सचिन एस., प्रभू पोवार, शाहीर एस., पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव, विष्णू टी. एम. आणि आदित्य लायकर यांनी चांगली लढत दिली.

अंतिम सामना:

स्पर्धेचा अंतिम सामना उद्या दुपारी ४ वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ 'अ' 

थोडे नवीन जरा जुने