BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर

 मुंबई दि.०६ : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला आणि युवकांसह समाजातील सर्व घटनांना सामावून घेणारा विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, शेती आणि सामाजिक योजनांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्याचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचा रोडमॅप असून यामुळे राज्याच्या प्रगतीला निश्चितच गती मिळेल आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल. राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आहे. एकंदरीत पाहता राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला महाराष्ट्र राज्याकडून शाश्वत विकासाची हमी देणारा असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. 


     


थोडे नवीन जरा जुने