BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात; भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या कोल्हापुरात महत्त्वाची बैठक

कोल्हापूर:

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी (दि. ६ मार्च २०२६) सकाळी ११ वाजता जिल्हा कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.


कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही जिल्ह्याच्या राजकारणातील आणि अर्थकारणातील महत्त्वाची संस्था आहे. लवकरच या संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून, त्या अनुषंगाने संस्था प्रतिनिधींचे ठराव गोळा करणे, ते दुग्धविकास कार्यालयात सादर करणे, त्याची पडताळणी करणे आणि कच्ची-पक्की मतदार यादी तयार करणे अशा तांत्रिक प्रक्रियांना वेग येणार आहे. भाजपशी संबंधित ज्या कार्यकर्त्यांच्या दूध संस्था आहेत, त्यांना या ठराव प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन या बैठकीत केले जाणार आहे.

या बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमूअण्णा पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, समरजितसिंह घाटगे आणि ग्रामीण पूर्वचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने