BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूर-सांगली महामार्गावर भीषण आग; रद्दीचे गोदाम खाक, लाखोंचे नुकसान

कोल्हापूर: कोल्हापूर-सांगली महामार्गावरील सांगली फाटा परिसरात आज दुपारी एका कागदी रद्दीच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या दुर्घटनेत गोदामाबाहेर उभा असलेला एक टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिकेच्या तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीत कोणाही जखमी झाले नसले तरी व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने अशा आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

थोडे नवीन जरा जुने