BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व; शिल्पा खोत अध्यक्ष तर तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज झालेली निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या शिल्पा शशिकांत खोत यांची अध्यक्षपदी, तर भाजपचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.


​सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने ही प्रक्रिया बिनविरोध झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या राजकीय रणनीतीचा हा मोठा विजय मानला जात आहे. या निवडीनंतर जिल्हा परिषद परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. ग्रामीण विकासाला गती देणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिल्पा खोत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

​ 

थोडे नवीन जरा जुने