BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात गॅस सिलिंडरचा तुटवडा; गृहिणींचे बजेट कोलमडले, लाकूड वखारीत गर्दी वाढली

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. बुकिंग करूनही १०-१५ दिवस सिलिंडर मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील नागरिक आता पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळू लागले असून लाकूड वखारींमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरात दररोज सुमारे १२ टनांहून अधिक लाकडाची विक्री होत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ मालकांनीही गॅस अभावी लाकडी इंधनाचा वापर सुरू केला आहे. गॅस कंपन्यांकडून पुरवठा सुरळीत न झाल्यास ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने