BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

पाटाकडील तालीम मंडळाची प्रॅक्टिस क्लबवर मात; उपांत्य फेरीत प्रवेश

चंद्रकांत चषक फुटबॉल अपडेट
फुटबॉल अपडेट

चंद्रकांत चषक फुटबॉल : पाटाकडील तालीम मंडळाची प्रॅक्टिस क्लबवर मात; उपांत्य फेरीत प्रवेश

कोल्हापूर | छत्रपती शाहू स्टेडियम

कोल्हापूर येथील प्रतिष्ठेच्या ‘चंद्रकांत चषक’ फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळाने (PTM) आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर २-० ने मात केली.

या विजयासह पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश निश्चित केला आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडील संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. खेळाच्या ५ व्या मिनिटालाच प्रथमेश हेरेकरच्या अचूक पासवर यशराज कांबळेने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४० व्या मिनिटाला ओमकार मोरेच्या पासवर अमन काझिनने दुसरा गोल केला.

उत्तरार्धात प्रॅक्टिस क्लबने गोलची परतफेड करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. सुजित एस, सूरज जाधव, साहिल डाकवे आणि अजिंक्य नलवडे यांनी पाटाकडीलच्या बचावफळीवर वारंवार हल्ले चढवले, मात्र पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळी याने ते मोडीत काढले.

सामनावीर: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमर गवळीला 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले.
उद्याचा सामना (उपांत्य फेरी):

खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ

थोडे नवीन जरा जुने