BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

अटीतटीच्या लढतीत खंडोबा तालीम मंडळाचा विजय; दिलबहारचा ३-२ ने पराभव करत गाठली अंतिम फेरी

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा

अटीतटीच्या लढतीत खंडोबा तालीम मंडळाचा विजय; दिलबहारचा ३-२ ने पराभव करत गाठली अंतिम फेरी

कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी


खंडोबा तालीम मंडळ
3
VS
दिलबहार तालीम मंडळ
2

येथील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या 'चंद्रकांत चषक' फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज खंडोबा तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर ३-२ अशा गोलफरकाने मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

सामन्याच्या पूर्वार्धात खंडोबाने आक्रमक खेळ करत ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. ३३ व्या मिनिटाला प्रभू पोवारने मिळालेल्या पेन्ल्टीचा अचूक फायदा घेत पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ३५ व्या मिनिटाला ऋतुराज संकपाळच्या पासवर रोहित जाधवने दुसरा गोल केला. पूर्वार्धाच्या जादा वेळेत (४०+१ मिनिटाला) पृथ्वीराज साळोखेच्या पासवर पुन्हा एकदा प्रभू पोवारने गोल करत खंडोबाची बाजू भक्कम केली.

उत्तरार्धात दिलबहारने जोरदार मुसंडी मारली. थांगजेलीनच्या पासवर ६८ व्या मिनिटाला एल. गोंगलने गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, शेवटपर्यंत ही आघाडी टिकवून ठेवण्यात खंडोबा यशस्वी ठरला.

सामनावीर: विष्णू टी. एम. (खंडोबा तालीम मंडळ)

उद्याचा सामना (दुसरी उपांत्य फेरी):
पाटाकडील तालीम मंडळ 'अ' विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ
थोडे नवीन जरा जुने