BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

पाटाकडील तालीम मंडळ अंतिम फेरीत; बालगोपालचा २-० ने पराभव

चंद्रकांत चषक फुटबॉल बातमी - Animated

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा

पाटाकडील तालीम मंडळ अंतिम फेरीत; बालगोपालचा २-० ने पराभव

कोल्हापूर | प्रतिनिधी


पाटाकडील तालीम मंडळ (PTM) २ - ० बालगोपाल तालीम मंडळ (BGM)

छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या 'चंद्रकांत चषक' फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने बालगोपाल तालीम मंडळावर २-० अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सामन्याचा वृत्तांत:

सामन्याच्या ५ व्या मिनिटाला आमीन काझीरने गोल नोंदवून पाटाकडीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पावसाने हजेरी लावली, मात्र भर पावसातही खेळाडूंचा उत्साह कायम होता. ५७ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर आमीन काझीरने हेडरद्वारे दुसरा गोल करत विजय निश्चित केला.

पाटाकडीलचे उत्कृष्ट खेळाडू:
  • ऋषिकेश मेथे पाटील, ओमकार मोरे, अक्षय पायमल, नबी, रोमारियो, यशराज कांबळे, अमर गवळी.
बालगोपालचे उत्कृष्ट खेळाडू:
  • ऋतुराज पाटील, फेला, वैभव देसाई, देवराज मंडलिक, अभिनव साळोखे, रोहित कुरणे.
सामनावीर: आमीन काझीर (पाटाकडील तालीम मंडळ)
महाअंतिम सामना

रविवार, २९ मार्च २०२६
पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ

थोडे नवीन जरा जुने