BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

चंद्रकांत चषक फुटबॉल: बालगोपाल आणि सम्राट नगर स्पोर्ट्सचा विजय

चंद्रकांत चषक फुटबॉल: बालगोपाल आणि सम्राट नगर स्पोर्ट्सचा विजय | NewsKattaa
Football Match Kolhapur
क्रीडा बातमी २१ मार्च २०२६ | कोल्हापूर

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा: बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राट नगर स्पोर्ट्सचा विजय

कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या 'चंद्रकांत चषक' वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राट नगर स्पोर्ट्स या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत वर्चस्व राखले.

सम्राट नगरची ट्रायब्रेकरवर बाजी

सकाळच्या सत्रात सम्राट नगर स्पोर्ट्स आणि मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधल्याने सामन्याचा निकाल 'ट्रायब्रेकर'वर लावण्यात आला. यामध्ये सम्राट नगरच्या अभिषेक सिंग, निरंजन कामते, सुमीत कुमार आणि कुणाल माने यांनी अचूक गोल करून आपल्या संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला.

बालगोपालचा एकतर्फी विजय

दुपारच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. बालगोपालच्या फेला याने ५ व्या आणि ८५ व्या मिनिटाला दोन गोल केले, तर ऋतुराज पाटील आणि देवराज मंडलिक यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला ४-१ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.

आजचे सामने (शनिवार):
  • प्रॅक्टिस क्लब विरुद्ध वर्षा विश्व
  • पाटाकडील तालीम 'अ' विरुद्ध रंकाळा तालीम
थोडे नवीन जरा जुने