BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

रूपाली चाकणकर यांचा राजीनामा

रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा; अशोक खरात प्रकरण भोवले!
BREAKING NEWS

रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा; खरात प्रकरण भोवल्याची चर्चा

📅 १० मे २०२४ | 📍 मुंबई


Rupali Chakankar

मुंबई:

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा **रुपाली चाकणकर** यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री **सुनेत्रा पवार** यांच्याकडे सोपवला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वयंघोषित ज्योतिषी **अशोक खरात** याच्यावरील महिला अत्याचार प्रकरणामुळे चाकणकर या मोठ्या वादात सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री **देवेंद्र फडणवीस** यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच महिला आयोगाच्या वतीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची विनंतीही त्यांनी केली होती.

"अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे एकत्रित फोटो आणि पाद्यपूजन कार्यक्रमातील सहभाग समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती."

खरातच्या पाद्यपूजन कार्यक्रमात चाकणकर सहभागी झाल्याचे तसेच एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी त्याचे कौतुक केल्याचेही उघड झाले. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीका वाढली होती आणि राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. या वाढत्या दबावामुळे अखेर चाकणकर यांनी आपल्या पदाचा निरोप घेतला आहे.

टॅग्स: #RupaliChakankar #MaharashtraPolitics #WomenCommission #BreakingNews #MarathiNews

थोडे नवीन जरा जुने