BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

सतेज पाटील विधानपरिषदेचे नवे विरोधी पक्षनेते?

 मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेतील रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच अखेर सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सतेज (बंटी) पाटील यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभापती राम शिंदे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव विधानपरिषदेत महाविकास आघाडीमधील काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसने आपला दावा अधिक बळकट केला आहे. सतेज पाटील यांचा प्रशासकीय अनुभव आणि सभागृहातील आक्रमक मांडणी लक्षात घेता, काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. या संदर्भातील अधिकृत पत्र यापूर्वीच सभापतींकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा आणि राजकीय समीकरणे काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी काही काळापूर्वी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सभागृहातील गणिते बदलली होती. मात्र, तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेते निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापती राम शिंदे यांनीही या प्रक्रियेवर सकारात्मक संकेत दिले असून, कोणत्याही क्षणी ही घोषणा होऊ शकते.

विरोधकांची धार वाढणार? सतेज पाटील यांच्यासारखा अनुभवी नेता विरोधी पक्षनेतेपदी आल्यास, आगामी काळात सत्ताधारी महायुती सरकारला सभागृहात घेरणे विरोधकांसाठी सोपे होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित काळात ही घोषणा झाल्यास सतेज पाटील थेट विरोधी पक्षनेते म्हणून सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवताना दिसतील.

थोडे नवीन जरा जुने