BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

शहाजी छत्रपती महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर: (प्रतिनिधी)

कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘शहाजीयन विद्यार्थी मंडळ’ (माजी विद्यार्थी संघ) यांच्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी डॉ. सौ. नूतन दत्तात्रय राऊत लिखित 'Marketing Practices in Self Help Groups' या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक बचत गटांच्या विपणन पद्धतींवर प्रकाश टाकणारे असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ते मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सुकेशनी कांबळे (PhD Student)


 आणि अतुल साळोखे यांचा त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनुभवी माजी विद्यार्थी प्राध्यापक विवेक पोर्लेकर आणि एस. चौगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.


कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी भूषविले. व्यासपीठावर शहाजीयन विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब पं. पाटील, प्रा. एस. टी. मुळे, प्रा. सुधाकर मानकर आणि प्रा. डी. डी. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्राध्यापक पी. के. पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक शेळके यांनी मानले. या मेळाव्याला महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने