BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

विभागीय सहसंचालक पदावर डॉ. प्रकाश बच्छाव – शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्याकडून स्वागत

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) म्हणून डॉ. प्रकाश बच्छाव यांची निवड झाली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव, शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न आणि प्रशासनातील कुशल कारभार लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.


या नियुक्तीनंतर शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी डॉ. बच्छाव यांचे पुष्पगुच्छ देऊन मनापासून स्वागत केले. यावेळी करण कवठेकर, अजय शिंगे, विवेक पोर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत सोहळ्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी डॉ. बच्छाव यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


डॉ. बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर विभागातील उच्च शिक्षण संस्था अधिक सक्षम होतील, शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासनिक पारदर्शकता वाढेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


उच्च शिक्षण विभागाकडून सध्या अभ्यासक्रमातील सुधारणा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, तसेच कौशल्याधारित शिक्षण यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बच्छाव यांची नियुक्ती हा कोल्हापूर विभागासाठी सकारात्मक टप्पा मानला जात असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा आहे.

थोडे नवीन जरा जुने