BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

जुना वाद ठरला जीवघेणा… कोल्हापुरात खून, परिसरात तणाव

 कोल्हापूर – शहरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात मध्यरात्री चाकू आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात मेहेर याख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका तरुणालाही मारहाण करण्यात आली असून तो गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यामागे जुना वाद असल्याचे सांगितले जात असून सिद्धांत गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ सांखळे, मयूर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडले यांच्यासह इतर काही जणांनी एकत्रितपणे तलवार, कोयता, लोखंडी गज यांसारखी हत्यारे वापरत हा भयंकर हल्ला केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.


या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. खबरदारी म्हणून परिसरात पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

थोडे नवीन जरा जुने