BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

राज्याच्या युवा धोरण समितीत विधी पळसापुरे यांची निवड - सर्वात युवा सदस्य म्हणून मिळवला सन्मान...

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत केली असून या समितीत राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त विधी सुभाष पळसापुरे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्या समितीतील सर्वात युवा सदस्य ठरल्या आहेत.


राज्यातील युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे समाधान, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक दिशा आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी युवा धोरण महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या समितीचे कार्य अत्यंत जबाबदारीचे असून युवकांच्या भविष्यास दिशा देणारे आहे. बदलत्या काळातील आव्हानांचा विचार करून शिक्षण, रोजगार, क्रीडा, संस्कृती, सामाजिक सहभाग आणि उद्योजकता यांसारख्या विविध क्षेत्रांत युवा धोरणाचा आराखडा तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे.


विधी पळसापुरे या मागील पाच वर्षांपासून युवक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या संसदेत केलेल्या प्रभावी भाषणाने लाखो लोकांची मने जिंकली होती. त्यामुळे त्यांचा या समितीतील समावेश हा केवळ सन्मानच नव्हे, तर युवकांचा खरा आवाज या समितीत पोहोचेल, अशी खात्री दिलासा देणारी ठरते.


गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास”


लातूरपासून सुरू झालेला प्रवास थेट दिल्लीपर्यंत पोहचला आणि दिल्लीतून सुरू झालेला प्रवास आज देशभर पसरला आहे. दिसायला सोपा वाटणारा हा प्रवास प्रत्यक्षात मेहनत, संघर्ष आणि जिद्दीने सजलेला आहे. वाचन, लेखन आणि प्रभावी वक्तृत्व यांचा मिलाफ झाल्यावर एखादी व्यक्ती किती उंच भरारी घेऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे विधी पळसापुरे.


आपल्या बुलंद आवाजातून संसद गाजवणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विधीने अगदी कमी वयात राष्ट्रीय युवा पुरस्कार पटकावला. तिच्या कविता, भाषणं आणि लिखाण हे सोशल मीडियावर हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.


यश म्हणजे फक्त स्वतःचं करिअर घडवणं नसून, अनेकांना मार्ग दाखवणं, प्रेरणा देणं आणि समाजासाठी काहीतरी घडवणं हेच खरं यश आहे. आणि याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या सुधारित युवा धोरण समितीत सर्वात युवा सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड..


गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाव पोहोचलेली ही तरुणी आता राज्याच्या धोरणनिर्मितीत आपला ठसा उमटवणार आहे. त्यामुळे तिच्या पुढील वाटचालीकडून अजून मोठ्या शिखरांच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

थोडे नवीन जरा जुने