BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

रेडिओ केवळ करमणूक नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम – यशवंत कुलकर्णी

 कोल्हापूर | प्रतिनिधी

"रेडिओ हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे," असे मत रेडिओ ऑरेंज, सांगलीचे प्रमुख यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभाग आणि वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात 'रेडिओ ब्रॉडकास्टिंग' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत रेडिओ क्षेत्रातील तीन अनुभवी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


 यशवंत कुलकर्णी यांनी ‘रेडिओ प्रोग्राम’ या विषयावर सखोल माहिती देताना सांगितले की, "रेडिओ हे दर्जेदार कार्यक्रमांद्वारे समाजमनावर खोलवर प्रभाव टाकू शकते. श्रोत्यांच्या मनात दीर्घकाळ टिकणारे कार्यक्रम निर्मिती करणे ही खरी ताकद आहे."


 ‘आपलं एफएम’चे लोकप्रिय आरजे शरद खोबरे यांनी “रेडिओ स्क्रिप्ट आणि अँकऱिंग” या विषयावर मार्गदर्शन केले. आवाज, शब्द आणि भावना यांचा योग्य समन्वय साधण्याचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. तसेच अँकऱिंगचे थेट प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला.


 आकाशवाणी कोल्हापूरचे निवृत्त प्रतिनिधी रवींद्र कुलकर्णी यांनी "सोशल मीडियाच्या युगातही आकाशवाणी केंद्राची विश्वासार्हता टिकून आहे. आजही अनेक लोकं विश्वासाने आकाशवाणीवरील बातम्या व कार्यक्रम ऐकतात," असे सांगितले.

उद्घाटनप्रसंगी पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “विद्यापीठीन काळात अशा कार्यशाळांद्वारे व्यावसायिक अनुभव घेणे ही काळाची गरज आहे. या कार्यशाळा म्हणजे करिअरच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”

या कार्यशाळेस प्रा. डॉ. शिवाजी जाधव, शैलेश कोरे, विवेक पोर्लेकर, सुधाकर बर्गे यांच्यासह विद्यापीठ व वारणा महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार तेजश्री शिंदे यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने