BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

नवकेतन मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेश महोत्सव : २४ वर्षांची भक्तीमय परंपरा

विशेष बातमी स्नेहल तोडकर 

श्री गणेशाची आराधना, भक्तीमय वातावरण आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गेली २४ वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नवकेतन मित्र मंडळ सार्वजनिक गणेश महोत्सवाने यंदा एक विशेष टप्पा गाठला आहे.


सन २००२ मध्ये स्थानिक भक्तांच्या सहकार्याने व श्री गणपती बाप्पांच्या कृपेने मंडळाची स्थापना झाली. सुरुवातीला लहानशा मूर्ती व काही सदस्यांसोबत सुरू झालेला हा उत्सव, कालांतराने सांस्कृतिक कार्यक्रम, भजन मंडळे आणि विविध उपक्रमांनी अधिक समृद्ध होत गेला.


सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने रक्तदान शिबिरे, तसेच गरजूंसाठी उपयुक्त अशा उपक्रमांची परंपरा सुरू केली. विशेष म्हणजे, अडचणीच्या काळातही साधेपणाने पण अखंड भक्तिभावाने उत्सव सुरू ठेवण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.


यंदा २४व्या वर्षात पदार्पण करत मंडळाने प्रथमच "गणपती बाप्पा आशीर्वाद कार्यक्रम" आयोजित केला असून, भाविकांमध्ये याबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.

 नवकेतन मित्र मंडळाने आजवर दाखवलेली सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जडणघडण पुढील काळातही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

थोडे नवीन जरा जुने