BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

संबंधाच्या गैरसमजातून शिरोलीत गोळीबार

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी परिसरात शनिवारी संध्याकाळी घडलेला गोळीबाराचा प्रकार ही केवळ गुन्हेगारी घटना नसून आपल्या समाजाच्या बिघडलेल्या मानसिकतेचे प्रतीक आहे. फेडरल बँकेसमोर संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या या थराराने संपूर्ण परिसर हादरला.


गणेश अर्जुन शेलार, विजय धोंडीराम पोवार आणि नितीन पाटील यांच्यात निर्माण झालेला वाद आधी किरकोळ स्वरूपाचा होता. मात्र जुन्या वैमनस्याची जोड, आर्थिक व्यवहारातील अडचणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका महिलेशी संबंधित गैरसमज या कारणांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. इतकेच नव्हे तर या वादाचे स्वरूप इतके चिघळले की थेट पिस्तुल काढून गोळीबार करण्यापर्यंत तो पोहोचला.


शहरातल्या बँकेसमोर 20-25 जणांचा जमाव जमतो, तणाव वाढतो आणि अचानक शेलारकडून विजय पोवारवर पिस्तुल रोखले जाते. जीव वाचला तो फक्त मित्रांनी वेळेत हात वर केल्यामुळे; अन्यथा परिस्थिती भीषण झाली असती. नशीब चांगले म्हणून गोळ्या हवेत झाडल्या गेल्या आणि थेट प्राणहानी टळली. पण त्यातून उडालेला गोंधळ आणि नागरिकांत निर्माण झालेली भीती आजही ताजी आहे.


यानंतर शेलारने स्वतःहून पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पिस्तुल आणि रिकामे काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत. विजय पोवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत महिलेशी संबंधित गैरसमज व आर्थिक देणंघेण हा वादाचा मूळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.


या घटनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की किरकोळ वाद तात्काळ सोडवण्याऐवजी ते मनात साचवत नेल्यास त्याचे परिणाम किती घातक होऊ शकतात. समाजातल्या नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद हरवल्यास परिस्थिती गोळीबारापर्यंत पोहोचू शकते, हे शिरोलीतील या घटनेने दाखवून दिले आहे...

थोडे नवीन जरा जुने