BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

thackeray brothers-unity - ठाकरे बंधूंची राजकीय एकजूट; शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी एकत्र येत शिवसेना (ठाकरे गट) व मनसे युतीची औपचारिक घोषणा केली आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बेस्ट निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रणित उत्कर्ष पॅनलसोबत एकत्र लढणार आहेत.


गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटींनी राजकीय चर्चांना उधाण आले होते. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली, त्यानंतर मराठी भाषा व हिंदी सक्तीविरोधी आंदोलनातही दोघे एकत्र दिसले. या पार्श्वभूमीवर आता बेस्ट निवडणुकीत झालेली युती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक नवा अध्याय ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संजय राऊत यांनीही युतीसाठी जनतेचा दबाव असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका भाजपच्या हातात जाऊ न देण्याचा मनोदय दोन्ही पक्षांनी दाखवला आहे. २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची युती भविष्यात अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत.

थोडे नवीन जरा जुने