BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

भारतावर ट्रम्प यांचा टेरिफ हल्ला

वॉशिंग्टन/नवी दिल्ली – रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास भारताचा स्पष्ट नकार मिळाल्यानंतर, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टेरिफ कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (५ ऑगस्ट) सोशल मीडियावरून इशारा दिल्यानंतर अवघ्या २४ तासांतच त्यांनी प्रत्यक्ष कारवाई केली. या निर्णयामुळे भारतावर लागू होणाऱ्या एकूण कराचा दर ५० टक्क्यांवर पोहोचला आहे.


रशिया-युक्रेन युद्धानंतर पश्चिमी देशांनी रशियन तेलावर बहिष्कार टाकला असताना, भारताने मात्र परस्पर फायद्याचा व्यवहार सुरू ठेवला. ट्रम्प यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत भारताला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. आता प्रत्यक्षात कर वाढवून त्यांनी या इशाऱ्याची अंमलबजावणी केली आहे.


भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणावामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात अमेरिका अधिक कठोर भूमिका घेऊ शकते, अशी चर्चा वर्तुळात सुरू आहे.


थोडे नवीन जरा जुने