स्नेहल तोडकर विशेष लेख
आजचा तरुण वर्ग सोशल मीडियाच्या मोहजालात अडकला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब शॉर्ट्स आणि स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर तासन्तास घालवणं ही आता नवी सवय झाली आहे. यामुळे अभ्यास, झोप, आरोग्य आणि वैयक्तिक नातेसंबंध यावर घातक परिणाम होताना दिसतोय.
इंस्टाग्राम रील्स, युट्युब शॉर्ट्स आणि स्नॅपचॅट streaks या गोष्टींमुळे अनेक तरुण दिवसाचे 3 ते 5 तास मोबाईलवर स्क्रोल करत असतात. हे केवळ मनोरंजन न राहता, एक प्रकारचं व्यसन बनलं आहे.प्रत्येक लाईक, कमेंट आणि नोटिफिकेशनमागे dopamine नावाच्या हार्मोनची भूमिका असते. यामुळे अल्पकालीन आनंद मिळतो पण लवकरच मानसिक थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि चिडचिड निर्माण होते. अनेक विद्यार्थी अभ्यासाऐवजी मोबाईलमध्ये गुंततात. झोप कमी होते, डोळ्यांना ताण येतो, आणि शारीरिक हालचाली घटतात. काही मुलं तर वर्गातही फोनमध्येच बघताना दिसतात.सतत इतरांशी तुलना, कमी लाईक्समुळे उदासीनता, फॉलोअर्सच्या हव्यासामुळे अस्वस्थता – हे anxiety, depression आणि self-worth कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे.मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कर्णिक सांगतात की, “सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास तो फायदेशीर आहे. पण अतीव वापर केल्यास हे मानसिक आरोग्याचं संकट ठरू शकतं.”पालकही आपल्या मुलांच्या स्क्रोलिंग सवयींमुळे चिंतेत आहेत. शिक्षकांनी अनेकदा विद्यार्थ्यांच्या लक्षभंगावर आवाज उठवला आहे.
डिजिटल डिटॉक्स: आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहणं.
स्क्रीन टाइम मर्यादित करणं: मोबाईल वापरण्याची वेळ ठरवणं.
ऑफलाइन अॅक्टिव्हिटीज: मैदानी खेळ, वाचन, संवाद, छंद जोपासणं.
पालकांचा संवाद: मुलांशी खुलेपणाने बोलून त्यांना योग्य दिशा देणं.
शाळांमध्ये सोशल मीडिया जनजागृती वर्ग.
