BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली – पण... कारण अद्यापही गुलदस्त्यातच!

 

कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचं जिवंत प्रतीक असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग आता एक वर्ष पूर्ण होत आली असली तरी, या आगीत नेमकं काय झालं, हे अजूनही अस्पष्टच आहे. अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि महापालिकेच्या संयुक्त तपासानंतरही ही दुर्घटना घडली कशी, यावर अधिकृत आणि स्पष्ट निष्कर्ष अद्याप जनतेसमोर आलेला नाही.


ती रात्र अजूनही डोळ्यासमोर...

2024 साली एका रात्री नाट्यगृहात अचानक भीषण आग लागली. काही क्षणांत संपूर्ण स्टेज, सेटिंग्ज, तांत्रिक साहित्य, खुर्च्या आणि प्रमुख सभागृह राख झालं. नाट्यगृहातील ऐतिहासिक फलक, जुनी रंगभूमी सामग्रीही या आगीत खाक झाली. ही आग अपघाती होती का नियोजित? हा प्रश्न आजही कोल्हापुरात प्रत्येक रंगकर्मीच्या आणि नागरिकाच्या मनात खदखदतो आहे.

शॉर्टसर्किटची शक्यता सांगण्यात आली होती, पण ठोस पुरावे मिळाले नाहीत.काही तांत्रिक अहवालात सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या होत्या, हे नमूद करण्यात आलं, मात्र दोषी कोण हे ठरवण्यात यंत्रणांना अपयश आलं.सीसीटीव्ही फुटेज, उपस्थित कर्मचाऱ्यांचे जबाब, फायर अलार्म यंत्रणा यांचा उल्लेख केला गेला पण त्यातून काहीच ठोस निष्कर्ष निघाला नाही.त्यामुळेच ही केवळ अपघात नव्हती का? यामागे हेतुपुरस्सर कोणतेतरी षड्यंत्र होते का? हे अजूनही अनुत्तरितच आहे.


महापालिकेने काही दिवसांतच पुनर्बांधणीच्या घोषणा केल्या, निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र या दुर्घटनेचं मूळ कारण स्पष्ट न केल्यामुळे लोकांचा रोष आणि संशय वाढतच चालला आहे. "जर ही आग अपघाती असेल, तर त्याचा पुरावा सादर करावा. आणि जर कोणाची हलगर्जीपणा असेल, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे,"असं मत अनेक नाट्यसंस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलं आहे.

आज नाट्यगृहाच्या जागेवर नव्याने उभारणीचे काम सुरू झालं आहे. परंतु या नव्या इमारतीसोबत जनतेचा विश्वास, इतिहासाची सावली आणि सुरक्षिततेचा ठाम बंधनकारक आराखडा असेल का?

नाट्यगृह जळल्यावर मागे वळून पाहिलं, तर नियमित मेंटेनन्स, अग्निसुरक्षा चाचण्या, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झालं होतं का, याचा विचार होणं गरजेचं आहे.कोल्हापूरसारख्या सांस्कृतिक शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे केवळ इमारतींचंच नुकसान होत नाही, तर शहराच्या सांस्कृतिक आत्म्यालाच तडा जातो.आजही स्थानिक रंगकर्मी, नाट्यसंस्था, विद्यार्थ्यांचे गट नवीन प्रयोगांसाठी कोणतं व्यासपीठ निवडावं या संभ्रमात आहेत. एका आगीत वर्षानुवर्षांची कला, मेहनत, आठवणी आणि इतिहासही जळून गेला. पण प्रशासन मात्र अद्यापही शांत आहे.

"केशवराव भोसले नाट्यगृह जळलं कसं?" हा प्रश्न एका वर्षानंतरही गुलदस्त्यात का आहे?तपास यंत्रणा, पालिका प्रशासन आणि सांस्कृतिक खात्याने या प्रश्नाचं उत्तर देणं ही केवळ जबाबदारी नव्हे, तर कोल्हापूरच्या जनतेशी निष्ठेची कसोटी आहे....!


थोडे नवीन जरा जुने