BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

राजारामपुरीत नाचण्याचा वादातून तरुणावर चाकूहल्ला

कोल्हापूर : शहरातील राजारामपुरी परिसरात बुधवारी रात्री (दि. २७) गणेश आगमन मिरवणुकीत नाचताना तरुणांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाले. या हल्ल्यात वाजिंदर जमादार (रा. सायबर चौक, कोल्हापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


संध्याकाळी मिरवणूक चौथ्या गल्लीत पोहोचली असताना काही तरुणांमध्ये नाचाच्या मुद्द्यावरून चकमक झाली. सुरुवातीला सुरू झालेला हा वाद चिघळत गेला आणि जमादार याच्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आला. हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी जखमीला तातडीने रुग्णालयात हलवले.


या घटनेचा संपूर्ण प्रकार जवळच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. पोलिसांनी ते फुटेज जप्त करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले आहेत.


सध्या पोलिसांनी काही संशयितांची ओळख पटवली असून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. नाचाच्या किरकोळ वादातून एवढ्या मोठ्या स्वरूपाचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.





थोडे नवीन जरा जुने