BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

विशाळगड दंगल प्रकरणातील मुख्य संशयित रवींद्र पडवळ अखेर अटकेत

कोल्हापूर : विशाळगड दंगल प्रकरणातील प्रमुख संशयित रवींद्र दिलीप पडवळ (रा. फुरसुंगी, ता. हवेली, पुणे) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल वर्षभर फरारी असलेल्या पडवळला शाहूवाडी पोलिसांनी पुण्यात सापळा रचून अटक केली.


गेल्या काही महिन्यांपासून त्याचा शोध सुरू होता. नुकतेच पदभार स्वीकारलेले जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रित करून पथकांना स्पष्ट दिशा दिली होती. त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे ही कारवाई शक्य झाल्याचं मानलं जात आहे.


१५ जुलै २०२५ रोजी विशाळगड परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मोठा जमाव बेकाबू झाला होता. त्यावेळी दगडफेक, दुकाने जाळणे, वाहनांची तोडफोड अशी गंभीर घटना घडली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच प्रकरणात पडवळसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र पडवळ तेव्हापासून फरार राहिला होता.


दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गणेशोत्सवाच्या गर्दीत पडवळला पुण्यातून पकडलं.


पडवळला न्यायालयात हजर करण्यात आलं असून ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

थोडे नवीन जरा जुने