BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

मोरया’च्या जयघोषात शहर भक्तिरंगात रंगलं

कोल्हापूर :

विघ्नहर्त्याचं आगमन होताच कोल्हापूरकरांचा उत्साह उफाळून आला आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरात “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया” च्या गजराने वातावरण भारलं. शाहुपुरी, कुंभार गल्ली, बापट कॅम्प, पापाची तिकटी परिसरात चिरमुरे उधळत, फुलांचा वर्षाव करत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं.


घराघरात पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेशमूर्ती घरी आणण्यात आल्या. ढोल-ताशांच्या गजरात सजवलेल्या मंडपात आणि आरासीत गणराय विराजमान झाला. प्रत्येक गल्लीत विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी सजावट आणि भक्तिरसाचं वातावरण दिसत आहे.


सार्वजनिक मंडळांच्याही मंडपांत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना सुरू असून आकर्षक सजावटीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. आधल्या दिवसापासूनच मिरवणुकांनी शहर दणाणलं होतं. पारंपरिक पोशाखात, झांज-पथक, लेझीम आणि वाद्यांच्या तालावर तरुणाई रंगली.


बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच गजबज दिसली. फुलं, सजावटीसाठी साहित्य, दिवे, आरास यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्येक घरात आणि मंडळात बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे.गणेशोत्सवाच्या आगमनानं कोल्हापूरचं वातावरण भक्तिरस, आनंद आणि मंगलमयतेनं उजळून निघालं आहे.



थोडे नवीन जरा जुने