BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या युवा कॉन्ट्रॅक्टरच्या कुटुंबियांची आमदार सतेज पाटील यांनी घेतली भेट

 

तांदुळवाडी (जि. सांगली) तांदुळवाडी येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी कामाचे बिले वेळेवर न मिळाल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक पातळीवर शासन यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हर्षल पाटील यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व मदत व पाठपुरावा केला जाईल, असा ठाम शब्द त्यांनी यावेळी दिला.


 "न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ" – सतेज पाटील

या भेटीत आमदार पाटील यांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडे या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. "एका कष्टकरी तरुणाचे आयुष्य चुकीच्या सिस्टीममुळे संपले, हे अत्यंत वेदनादायक आहे. हर्षलला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू," असे आश्वासन त्यांनी दिले.


थोडे नवीन जरा जुने