BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडे

पुणे : सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, ११ महिन्यांची नियुक्ती, मूळ वेतन, रजा आणि सेवास्थैर्य यांसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी सांगितले.


 

प्रचार दौऱ्यादरम्यान गावडे यांनी विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन प्राध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी प्राध्यापकांनी आपल्या सेवाविषयक समस्या आणि मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मानधनातील मर्यादा, नियुक्तीतील अनिश्चितता आणि सेवाविषयक सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षे अध्यापन करूनही सेवेला स्थैर्य मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे गावडे यांनी सांगितले.

सीएचबी प्राध्यापकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ११ महिन्यांची नियुक्ती मिळावी, यासाठी मुलाखतींची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र प्राध्यापकांना ॲड-हॉक पूर्णवेळ नियुक्ती आणि मूळ वेतन देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी मांडली.

नियमित नियुक्ती प्रक्रियेत नियमानुसार सीएचबी सेवाकाळातील अनुभवाला प्राधान्य देणे, हक्काच्या व वैद्यकीय रजा उपलब्ध करून देणे आणि प्राध्यापकांच्या संशोधन कार्याला तसेच प्रकाशित शोधनिबंधांना योग्य मान्यता देणे गरजेचे असल्याचे गावडे म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीमुळे वाढलेला अध्यापनाचा कार्यभार लक्षात घेऊन आवश्यक प्राध्यापक पदांना मान्यता देण्याबाबतही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीएचबी प्राध्यापकांचे प्रश्न केवळ मानधनवाढीपुरते मर्यादित नसून ते सेवास्थैर्य, आर्थिक सुरक्षितता आणि उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित आहेत. या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावेत आणि प्राध्यापकांना न्याय मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही कौस्तुभ गावडे यांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने