BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

अभाविप कोल्हापूर महानगरच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; विद्यार्थीहित, समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प

३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; ‘उत्कर्ष २०२६’
ज्ञान • शील • एकता

३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; ‘उत्कर्ष २०२६’मधून विद्यार्थी नेतृत्वाला नवी दिशा!

अभाविप कोल्हापूर महानगरच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; विद्यार्थीहित, समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प

शाहू स्मारक, कोल्हापूर | ६ ऑगस्ट २०२६

कोल्हापूर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर आयोजित ‘उत्कर्ष २०२६ – प्रतिभा सन्मान सोहळा व कार्यकर्ता संमेलन’ शाहू स्मारक, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील गुणवत्तेचा गौरव करण्यासोबतच विद्यार्थी नेतृत्वाला दिशा देणे, कार्यकर्त्यांना नवी जबाबदारी देणे आणि विद्यार्थी शक्तीला राष्ट्रनिर्माणाच्या कार्याशी जोडणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूर्व कार्यकर्ते व अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान

कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ नामांकित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांतील प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थी, NSS व NCC मधील उत्कृष्ट कॅडेट व स्वयंसेवक, क्रीडा, कला, तसेच NEET परीक्षेत ५०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

पालक व शिक्षकांचे योगदान

विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशामागे त्यांच्या पालकांचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या पालक व शिक्षकांच्या मोलाच्या योगदानाचीही विशेष दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक

श्री. देवदत्त जोशी

प्रमुख मार्गदर्शक
(राष्ट्रीय सह संघटनमंत्री)

श्री. दीपक चोरगे

प्रमुख अतिथी
(प्रसिद्ध उद्योजक)

प्रमुख पदाधिकारी

प्रा. डॉ. सुनील गुरव (महानगर अध्यक्ष)
प्रेम राजमाने (महानगर मंत्री)
तनिष्क दळवी (कार्यक्रम प्रमुख)

कार्यक्रम मनोगत व मार्गदर्शन

प्रास्ताविक: प्रा. डॉ. सुनील गुरव (महानगर अध्यक्ष)

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना त्यांनी आजच्या Gen Z पिढीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात माहिती व तंत्रज्ञानाशी जोडलेली असून तिच्यात मोठी क्षमता आहे. या पिढीतील सुप्त प्रतिभा ओळखून तिला विधायक, सामाजिक व राष्ट्रहिताच्या दिशेने योग्य मार्गदर्शन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवल शैक्षणिक गुणवत्तेपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये नेतृत्व, सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना व राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

वार्षिक प्रतिवेदन: वेदांत कुलकर्णी (मागील वर्षाचे जिल्हा संयोजक)

वार्षिक मंत्री प्रतिवेदन सादर करत त्यांनी अभाविप कोल्हापूर महानगरच्या मागील वर्षभरातील कार्याचा आढावा मांडला. यामध्ये ‘नमामी पंचगंगा’ अभियान, फुटबॉल स्पर्धा, उन्हाळी सुट्टी शिबिर यांसह विविध विद्यार्थीहिताचे, सामाजिक व संघटनात्मक उपक्रम, विद्यार्थी प्रश्नांवरील आंदोलने तसेच विविध महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघटनात्मक क्षमता वाढविण्यासाठी वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावाही त्यांनी मांडला.

मनोगत: प्रेम राजमाने (नवनिर्वाचित महानगर मंत्री)

संस्थेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ते म्हणाले की, अभाविपच्या कोल्हापूर महानगराच्या इतिहासात कमी वयात महानगर मंत्री म्हणून जबाबदारी मिळणे हा केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी आहे.

“ही जबाबदारी केवळ एका व्यक्तीची नसून कोल्हापूर महानगरातील प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. येणाऱ्या काळात महानगरातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अभाविपचे कार्य, विचार आणि विद्यार्थीहिताचे उपक्रम पोहोचविण्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांच्या साथीने प्रयत्न करू. प्रत्येक महाविद्यालयात सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडवून विद्यार्थी प्रश्नांवर प्रभावीपणे काम करू. येणाऱ्या काळात आपण दाखवून देऊ की ही Gen Z पिढी राष्ट्रहितासाठी काम करणारी पिढी आहे, कोणत्याही प्रपोगंडामध्ये फसणारी नाही. विद्यार्थी शक्तीला योग्य दिशा देत विद्यार्थीहित, समाजहित आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करू.”

प्रमुख अतिथी: श्री. दीपक चोरगे (उद्योजक)

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी व्यसनांपासून दूर राहून कौशल्यविकासावर भर देण्याचे आवाहन केले. उद्योग क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असल्याचा अनुभव सांगत त्यांनी युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनले पाहिजे असे प्रतिपादन केले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने वाढ केली पाहिजे. शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव, नवकल्पना, उद्योजकता आणि आत्मविश्वास यांना महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शन: श्री. देवदत्त जोशी (राष्ट्रीय सह संघटनमंत्री)

विद्यार्थ्याचा सन्मान होताना तो क्षण पालकांच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण असतो, असे सांगत विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक व शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या काळात शिक्षण, न्याय व राजकीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत Gen Z पिढीकडे दोषारोपाच्या नजरेने न पाहता तिच्यातील क्षमता ओळखून तिला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजचा विद्यार्थी माहितीच्या अभावामुळे नव्हे, तर योग्य-अयोग्य यातील विवेक जागृत करणाऱ्या योग्य मार्गदर्शकांच्या अभावामुळे संभ्रमात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना सक्षम मेंटॉरशिप मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध विद्यार्थी आंदोलनांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांविषयी जागरूकता वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाचे विचार:

  • “या देशात सर्वोच्च भारतमाता आहे आणि तिची सेवा करणे हे प्रत्येक तरुणाचे कर्तव्य आहे.”
  • “आजच्या तरुणांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत, त्यावर देशाची दिशा ठरते.” - सांस्कृतिक भान जपणे गरजेचे.
  • “आम्ही १९४७ पाहिले नाही; परंतु २०४७ पाहणार आहोत. विकसित भारताच्या निर्मितीत भारतीय तरुण जगाला दिशा देणार आहेत.”

विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या गुणवत्तेचा गौरव नसून, भविष्यातील कर्तव्याची जाणीव करून देणारा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

अभाविप कोल्हापूर महानगर - नवी कार्यकारिणी

कार्यक्रमा दरम्यान अभाविप कोल्हापूर महानगरच्या नवीन कार्यकारिणीसाठी निर्वाचन प्रक्रिया पार पडली. श्री. केशव गोवेकर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

महानगर अध्यक्ष (पुनर्निवड)

प्रा. डॉ. सुनील गुरव

महानगर मंत्री (नवनिर्वाचित)

प्रेम राजमाने

यासोबतच महानगर कार्यकारिणी, ३ नगर कार्यकारिणी तसेच ७ महाविद्यालय कार्यकारिणींची घोषणा करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनवृद्धी, विद्यार्थी प्रश्नांवर प्रभावी कार्य आणि राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित कार्यकर्ते घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कृतज्ञता व आभार

कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, राष्ट्रभक्ती व कर्तव्यभावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. ‘ज्ञान • शील • एकता’ या ब्रीदवाक्याला समोर ठेवून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रम आभार प्रदर्शन: तनिष्क दळवी (कार्यक्रम प्रमुख)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कोल्हापूर महानगर

‘उत्कर्ष २०२६’ प्रतिभा सन्मान सोहळा व कार्यकर्ता संमेलन
थोडे नवीन जरा जुने