NEWS मराठी
जिल्हा परिषद सदस्य मानसी भोगण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी सदिच्छा भेट
जिल्हा परिषद सदस्य मानसी भोगण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी सदिच्छा भेट
कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य मानसी भोगण यांनी कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुनेत्राताई पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान विविध विषयांवर आपुलकीने संवाद साधण्यात आला.
यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतल्यानंतर मानसी भोगण यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांसह उपस्थित मान्यवर एकत्र दिसत आहेत. कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सदिच्छा भेटीकडे लक्ष वेधले जात आहे.
