गुणवत्तेसोबत ग्राहक सुविधांना ‘गोकुळ’चे प्राधान्य
गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाच्या आवारातील ‘गोकुळ शॉपी’चे नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतनीकृत ‘गोकुळ शॉपी’चे उद्घाटन करण्यात आले.
नूतनीकृत शॉपीला आकर्षक आणि सुसज्ज स्वरूप देण्यात आले आहे. येथे ग्राहकांना गोकुळचे दूध तसेच विविध दुग्धजन्य पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तसेच लस्सी, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी शॉपीमध्ये ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले, “गुणवत्तापूर्ण दूध व उत्पादने हीच गोकुळची ओळख आहे. गोकुळने गुणवत्तेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे हे गोकुळचे प्राधान्य आहे. ग्राहकांच्या सोयीचा विचार करूनच ताराबाई पार्क येथील गोकुळ शॉपीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.”
ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात दूध उत्पादक, ग्राहक, शासकीय अधिकारी आणि विविध मान्यवरांची नियमित ये-जा असते. त्यांना गोकुळचे दूध, दही, ताक, लस्सी, बासुंदी, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, पनीर, तूप, टेबल बटर, कुकिंग बटर, दूध पावडर, पेढा, फ्लेवर्ड मिल्क, गुलाबजामून, चीज, आईस्क्रीम यांसह विविध दुग्धजन्य पदार्थ या शॉपीमध्ये उपलब्ध होणार आहेत. नूतनीकरणामुळे ग्राहक आणि दूध उत्पादकांसाठी ‘गोकुळ शॉपी’ अधिक सोयीची ठरणार आहे.
शॉपीमध्ये उपलब्ध दुग्धजन्य पदार्थ
उद्घाटनप्रसंगी उपस्थित
उद्घाटनप्रसंगी गोकुळचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ.चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सिव्हील व्यवस्थापक प्रकाश आडनाईक, बाजीराव राणे, डॉ.एम.पी.पाटील, लक्ष्मण धनवडे, शॉपी चालक मंगेश गुरव, संघाचे कर्मचारी तसेच दूध उत्पादक व ग्राहक उपस्थित होते.
