BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

डी.वाय.पी. ग्रुप तर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेट

डी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेट
BREAKING
कोल्हापूर शहरासाठी मोठी बातमी! डी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेट
📍 कोल्हापूर | दि. २१

डी.वाय.पी. ग्रुपतर्फे
महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेट

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द

उपक्रमाचा उद्देश

कोल्हापूर शहरातील नागरिकांना अधिक चांगली व सुरक्षित प्रकाशव्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने डी.वाय.पी.ग्रुपच्यावतीने महानगरपालिकेला १५५० एल.ई.डी. दिवे प्रदान करण्यात आले. या उपक्रमाचा लोकार्पण व हस्तांतरण कार्यक्रम आज सकाळी ९:०० वाजता विठ्ठल रामजी शिंदे चौकात पार पडला.

१५५०
एलईडी दिवे

डी.वाय.पी. ग्रुपकडून कोल्हापूर महानगरपालिकेला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही मदत करण्यात आली.

उपक्रमाची ठळक माहिती

१५५०
एलईडी दिवे
८१
नगरसेवकांवर जबाबदारी
१० दिवस
आवश्यक ठिकाणी दिवे बसविण्याचे नियोजन

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांची भूमिका

शासनाच्या निर्णयाप्रमाणे खाजगी कंपनीला ठेका दिला होता तो ठेका ना मंजूर केल्याने शहरातील बरेच दिवे बंद आहेत. महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आवाहनानुसार आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या सहकार्याने डी.वाय.पी.ग्रुपच्यावतीने हे एलईडी दिवे देण्यात आले. पाटील कुटुंबीयाकडून शहर व जिल्ह्याला कायम भरभरुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

— विरोधी पक्षनेते राजेश लाटकर

आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड काय म्हणाले?

शहरामध्ये विविध समस्या आहेत. अतिक्रमण, स्वच्छता, पाणी अशा प्रत्येक समस्यांना कसे हाताळता येईल यासाठी संपूर्ण सभागृह प्रयत्नशील आहे. खूप सकारात्मक पध्दतीने हे सभागृह चालत आहे. मी मनापासून धन्यावाद देतो की आपल्याकडून शहरासाठी व महापालिकेला स्वत:च्या फंडामधून हे एलईडी प्राप्त करुन दिले. या एलईडीचे नियोजन येत्या १० दिवसात शहरातील ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी ते बसविण्यात येईल.

— आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांची भूमिका

कोल्हापूर शहरात तांत्रिक अडचणीमुळे एलईडी दिव्यांचा एक पेच निर्माण झाला होता. म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की, या एलईडी दिव्यांची ८१ नगरसेवकांवर जबाबदारी आम्ही देणार आहे. शहरातील ज्या ज्या ठिकाणी याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी हे एलईडी दिवे बसविणार आहे. महापालिका ही कोल्हापूर शहराचा आत्मा आहे. महापालिका व्यवस्थित राहणं, व्यवस्थित ठेवणं हे आपले सर्वांचं कर्तव्य आहे. शहरात चांगले उपक्रम, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने आपण केला पाहिजे. तसेच या शहराला विकसित करण्यासाठी, या शहराला एक चांगला चेहरा देण्यासाठी, या शहराच्या विकासामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न आपण सर्वांजण करुया.

— आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील

एलईडी दिव्यांचे हस्तांतरण

यानंतर हे एलईडी दिवे आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केले.

शहरातील विविध भागांमध्ये आवश्यकतेनुसार या एल.ई.डी. दिव्यांचा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे शहरातील रस्ते, चौक व सार्वजनिक परिसरातील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

सामाजिक बांधिलकीतून मदत

डी. वाय. पी. ग्रुपने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महापालिकेस केलेली ही मदत शहराच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, विशाल चव्हाण, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, शहर अभियंता रमेश मस्कर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, वेदवती मोहिते, गटनेत्या सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका दिपाली घाटगे, अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.

रविकांत आडसूळ
संजय मोहिते
विशाल चव्हाण
इंद्रजीत बोंद्रे
रमेश मस्कर
प्रवीण केसरकर
वेदवती मोहिते
प्रतिज्ञा उत्तुरे
दिपाली घाटगे
अमर समर्थ
प्रवीण सोनवणे
महाविकास आघाडीचे नगरसेवक
नगरसेविका
पदाधिकारी

संपूर्ण बातमी

कोल्हापूर, दि.२१ : कोल्हापूर शहरातील नागरिकांना अधिक चांगली व सुरक्षित प्रकाशव्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने डी.वाय.पी.ग्रुपच्यावतीने महानगरपालिकेला १५५० एल.ई.डी. दिवे प्रदान करण्यात आले. या उपक्रमाचा लोकार्पण व हस्तांतरण कार्यक्रम आज सकाळी 9:00 वाजता विठ्ठल रामजी शिंदे चौकात पार पडला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी बोलताना शासनाच्या निर्णयाप्रमाणे खाजगी कंपनीला ठेका दिला होता तो ठेका ना मंजूर केल्याने शहरातील बरेच दिवे बंद आहेत. महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आवाहनानुसार आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या सहकार्याने डी.वाय.पी.ग्रुपच्यावतीने हे एलईडी दिवे देण्यात आले. पाटील कुटुंबीयाकडून शहर व जिल्ह्याला कायम भरभरुन देण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी बोलताना शहरामध्ये विविध समस्या आहेत. अतिक्रमण, स्वच्छता, पाणी अशा प्रत्येक समस्यांना कसे हाताळता येईल यासाठी संपूर्ण सभागृह प्रयत्नशील आहे. खूप सकारात्मक पध्दतीने हे सभागृह चालत आहे. मी मनापासून धन्यावाद देतो की आपल्याकडून शहरासाठी व महापालिकेला स्वत:च्या फंडामधून हे एलईडी प्राप्त करुन दिले. या एलईडीचे नियोजन येत्या 10 दिवसात शहरातील ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी ते बसविण्यात येईल असे सांगितले. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी कोल्हापूर शहरात तांत्रिक अडचणीमुळे एलईडी दिव्यांचा एक पेच निर्माण झाला होता. म्हणून आंम्ही सर्वांनी निर्णय घेतला की, या एलईडी दिव्यांची 81 नगरसेवकांवर जबाबदारी आंम्ही देणार आहे. शहरातील ज्या ज्या ठिकाणी याची आवश्यकत आहे. त्या ठिकाणी हे एलईडी दिले बसविणार आहे. महापालिका हि कोल्हापूर शहराचा आत्मा आहे. महापालिका व्यवस्थित राहणं, व्यवस्थित ठेवण हे आपले सर्वांचं कर्तव्य आहे. शहरात चांगले उपक्रम, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने आपण केला पाहिजे. तसेच या शहराला विकसित करण्यासाठी या शहराला एक चांगला चेहरा देण्यासाठी, या शहराच्या विकासामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न आपण सर्वांजण करुया. यानंतर हे एलईडी दिवे आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केले. शहरातील विविध भागांमध्ये आवश्यकतेनुसार या एल.ई.डी. दिव्यांचा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे शहरातील रस्ते, चौक व सार्वजनिक परिसरातील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. डी. वाय. पी. ग्रुपने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महापालिकेस केलेली ही मदत शहराच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

थोडे नवीन जरा जुने