BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात रेकॉर्डवरील १६० गुन्हेगारांची पोलिसांकडून हजेरी

कोल्हापूर पोलीस विशेष मोहीम - गुन्हेगार हजेरी

कोल्हापुरात रेकॉर्डवरील १६० गुन्हेगारांची पोलिसांकडून हजेरी

रील्सद्वारे गुंडगिरीचे प्रदर्शन करणाऱ्यांनाही कडक इशारा

कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर शहर पोलिसांनी शुक्रवारी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची विशेष तपासणी मोहीम राबवली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १६० रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या वेळी प्रत्येकाची सविस्तर माहिती घेण्यात आली तसेच भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.

पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. गुन्हेगारांची अद्ययावत माहिती सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याकडे उपलब्ध राहावी, तसेच विविध गुन्ह्यांतील फरार आरोपींना तातडीने अटक करणे सुलभ व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

पोलिसांचा कडक इशारा (उपअधीक्षक प्रिया पाटील)

"पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होणे किंवा सोशल मीडियावर गुंडगिरीचे प्रदर्शन करणारे रील्स तयार करून प्रसारित करणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांना पोलिसांकडून कठोर उत्तर दिले जाईल."

या चौकशी दरम्यान गुन्हेगारांकडून सध्या ते कोणता व्यवसाय करतात, कोणाच्या संपर्कात आहेत, पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहेत का, यासह विविध बाबींची माहिती पोलिसांनी घेतली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनीही गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवत पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. या वेळी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एकूण हजर गुन्हेगार
१६०
चारही पोलीस ठाण्यांची एकत्रित कारवाई

पोलीस ठाणे निहाय आकडेवारी

लक्ष्मीपुरी ५६
शाहूपुरी ५३
राजारामपुरी ३०
जुना राजवाडा २४

सहभागी पोलीस अधिकारी

  • सुशांत चव्हाण (पोलीस निरीक्षक, LCB)
  • संतोष डोके (पोलीस निरीक्षक)
  • किरण लोंढे (पोलीस निरीक्षक)
  • विकास जाधव (पोलीस निरीक्षक)
  • विठ्ठल जाधव (पोलीस उपनिरीक्षक)

कोल्हापूर शहर पोलीस दल

© २०२६ | कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सदैव तत्पर.

थोडे नवीन जरा जुने