BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कळंबा फिल्टर हाऊसची भिंत हॉटेलवर ढासळली

कळंबा फिल्टर हाऊस दुर्घटना - विशेष वृत्त
विशेष वृत्त

कळंबा फिल्टर हाऊसची भिंत हॉटेलवर ढासळली

संभाजीनगर, कोल्हापूर

स्क्रोल कळंबा फिल्टर हाऊसची दगडी भिंत बाजूच्या हॉटेलवर कोसळून सुमारे ५० हजारांचं झालं नुकसान

अँकर

संभाजीनगर इथल्या कळंबा फिल्टर हाऊसच्या संरक्षक भिंतीचा काही भाग, बाजूच्या एका हॉटेलवर कोसळला. यात सुमारे ५० हजारांचं नुकसान झालं. भिंत पडल्याचा आवाज आल्यानं, हॉटेलमधील कामगारांनी बाजूला पळ काढला. त्यामुळ सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

व्ही.ओ. (V.O.)

कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या कळंबा फिल्टर हाऊसच्या पूर्व बाजूच्या संरक्षक भिंतीचा काही भाग, बाजूच्या एका हॉटेलवर कोसळला. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत, हॉटेलच्या किचनवरील पत्रा, लोखंडी पाईप आणि भिंतीचा भाग कोसळल्यान, सुमारे ५० हजारांच नुकसान झालं.

इथली संरक्षक भिंत धोकादायक बनल्याचं महापालिकेला कळवलं होतं. मात्र महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली नाही. त्यामुळ हा प्रकार घडल्याचा आरोप हॉटेल मालकांनी केला.

या कळंबा फिल्टर हाऊसच्या सभोवतालची संरक्षक भिंत अजूनही धोकादायक स्थितीत, तसंच ढासळलेल्या अवस्थेत आहे. आणखी काही दुर्घटना घडण्यापूर्वीच, महापालिका प्रशासनानं याची दुरुस्ती करून, नव्यानं ही संरक्षक भिंत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

नुकसान सुमारे ५० हजार रुपये
जीवितहानी नाही (कामगार वेळेत पळाले)
सद्यस्थिती भिंत अजूनही धोकादायक

कोल्हापूर स्थानिक वृत्त सेवा

© २०२६ | वृत्त वाहिनी फॉरमॅट आधारित डिझाइन.

थोडे नवीन जरा जुने