BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

राज्यातील शाळा सुरू होण्याच्या तारखा जाहीर

राज्यातील शाळा सुरू होण्याच्या तारखा जाहीर
School Reopening Maharashtra
महत्वाची घोषणा

राज्यातील शाळा सुरू होण्याच्या तारखा जाहीर; विदर्भात २२ जूनपासून, उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून वर्ग भरतील

मुंबई
|
शैक्षणिक वर्ष २०२६-२७
|
जून ९, २०२६ रोजी परिपत्रक जारी

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्याने राज्यातील शाळा कधी सुरू होणार, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शाळा सुरू होण्याच्या तारखांबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील विविध भागांतील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तेथील विद्यार्थ्यांना वाढीव सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विदर्भ विभाग


शाळा सुरू होणारी तारीख: सोमवार, २२ जून २०२६

तीव्र उष्णतेमुळे निर्णय व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश.

उर्वरित महाराष्ट्र


शाळा सुरू होणारी तारीख: सोमवार, १५ जून २०२६

मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह नियमित वेळेत सुरू.

परिपत्रकानुसार, विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सोमवार, २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सोमवार, १५ जून २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

"विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे."

थोडे नवीन जरा जुने