BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

नगरसेविका नेहा तेंडुलकर यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
कोल्हापूर, दि. १० जून

नगरसेविका नेहा तेंडुलकर यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

माजी मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका डॉ. नेहा अभय तेंडुलकर यांच्या पुढाकारातून बुधवारी राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दुसरा चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

"नसे हे केवळ रक्तदान... जीवनदानाचे कार्य महान"

या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थॅलेसेमिया रुग्णांना मदत व्हावी आणि रक्ताचा तुटवडा भरून निघावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी रक्तदान केले.

या उपक्रमासाठी अर्पण ब्लड बँकवैभवलक्ष्मी ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले. शिबिरादरम्यान रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात आले.


प्रमुख उपस्थिती व आवाहन:

यावेळी भाजपचे महेश जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आयोजकांनी रक्तदानासारख्या सामाजिक कार्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

थोडे नवीन जरा जुने