BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीतून तरुणीवर अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा

मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल | तरुणीवर अत्याचार
मुरगूड, प्रतिनिधी

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीतून तरुणीवर अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा

मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल | पोलीस तपास सुरू

ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलावून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेचा सविस्तर तपशील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके याच्याशी ओळख झाली होती. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तिला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले. त्यानंतर मुरगूड येथील तलाव परिसरात नेऊन तिचे फोटो काढले. हे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपीने पीडितेची ओळख रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली. फिर्यादीनुसार, रणजितने तिला गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर याने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून तिला एका लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच विक्रम रामचंद्र पाटील यानेही पाचगाव येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ

फिर्यादीनुसार, मुरगूड तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर शहरातील काही लॉज तसेच पाचगाव परिसरात वेळोवेळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले.

तसेच प्रकरण मिटवून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ डिलीट केले जाणार नसल्याची धमकी देत मानसिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झालेले आरोपी

पीडितेच्या फिर्यादीवरून मुरगूड पोलिसांनी खालील चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

१. आदित्य बाजीराव शेटके

रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी

२. रणजित संभाजी मुधोळकर

रा. सोळांकुर, ता. राधानगरी

३. प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर

रा. राधानगरी

४. विक्रम रामचंद्र पाटील

रा. बुजवडे, ता. राधानगरी

पोलीस कारवाई व तपास

थोडे नवीन जरा जुने