BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीला वेग- कृतज्ञता मेळावा व जाहीर सभा भव्य करणार – नाम. चंद्रकांतदादा पाटील

अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीला वेग
२० जून २०२६ | कोल्हापूर

अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीला वेग

कृतज्ञता मेळावा व जाहीर सभा भव्य करणार – नाम. चंद्रकांतदादा पाटील

मुख्य बातमी

कोल्हापूर, दि. १२ जून : केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय बैठक आज भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी केंद्र सरकारमार्फत मंजूर झालेल्या १५०० कोटी रुपयांच्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा कृतज्ञता मेळावा व जाहीर सभा भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत मार्गदर्शन करताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने १५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या निधीमुळे मंदिर परिसराचा विकास, वारसा संवर्धन तसेच भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण होण्यास मोठी गती मिळणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सभेचे नियोजन, कार्यकर्त्यांची उपस्थिती, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, प्रसिद्धी तसेच विविध विभागांतील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे बूथ स्तरापर्यंत संपर्क अभियान राबवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

अमित शहा यांचा दौरा कार्यक्रम

१९ जून २०२६

सायंकाळी कोल्हापूर येथे आगमन.

शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.

२० जून २०२६ - सकाळ

श्री अंबाबाई मंदिरात दर्शन.

मंदिर परिसर विकासकामांची पाहणी.

कृतज्ञता मेळावा

पोलीस ग्राउंड येथे भव्य जाहीर सभा.

नागरिकांना संबोधन.

इचलकरंजी दौरा

कलाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन.

रात्र

दिल्लीकडे प्रयाण.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

हसन मुश्रीफ

सहकार, बँकिंग आणि साखर उद्योगाशी संबंधित प्रश्नांवर अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची गरज व्यक्त.

राहुल आवाडे

सहकार व उद्योग क्षेत्रातील विविध विषय मांडण्याची भूमिका.

प्रकाश आबिटकर

भाविकांना सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची सूचना.

धनंजय महाडिक

महायुतीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

उपस्थित मान्यवर

नाम. चंद्रकांतदादा पाटील, नाम. हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, प्रकाश आवाडे, राजेश क्षीरसागर, समरजितराजे घाटगे, रूपाराणी निकम, संजयकाका पाटील, चंद्रदीप नरके, विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, समित कदम, महेश जाधव, सुजितभाऊ चव्हाण, प्रा. जयंत पाटील, अंबरीश घाटगे, मुरलीधार जाधव, राहुल चिकोडे, शिल्पा खोत, अक्षय जरग, भूषण पाटील, सावकर मादनाईक, विशाल शिराळे, संजय पाटील, स्वाती पाटील, शारंगधर देशमुख, सत्यजीत नाना कदम, आदिल फरास, कौसर बागवान, अनिल डाळ्या यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्याच्या यशासाठी पुढील नियोजन

दौऱ्याच्या यशस्वी नियोजनासाठी आगामी काही दिवसांत विविध आढावा व समन्वय बैठका आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Kolhapur Political News Special Report

© 2026 All Rights Reserved

थोडे नवीन जरा जुने