BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

नीट' पेपरफुटी प्रकरण: ठोस कारवाई करा नाही तर संबंधित कोचिंग क्लासेसला टाळे ठोकण्यात येईल, शाहू सेनेचा इशारा

'नीट' पेपरफुटी प्रकरण: शाहू सेनेचा इशारा
थेट इशारा कोल्हापूर घडामोडी

'नीट' पेपरफुटी प्रकरण: ठोस कारवाई करा नाही तर संबंधित कोचिंग क्लासेसला टाळे ठोकण्यात येईल, शाहू सेनेचा इशारा


कोल्हापूर देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, पुण्यापर्यंत जोडले गेले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) देशभरातून अनेकांना अटक केली आहे. या पेपरफुटीच्या टोळीमध्ये शिवराज मोटेगावकर सारख्या कोचिंग क्लास चालकाचा सहभाग असल्याचे समोर आले असून, हे अत्यंत संतापजनक आहे. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर जिल्ह्यातील दोषी कोचिंग क्लासेस आणि त्यांना मदत करणाऱ्या महाविद्यालयांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शाहू सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शाहू सेनेचे संस्थापक अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापुरात मोटेगावकर क्लासेससह इतर अनेक कोचिंग अकॅडमी कार्यरत आहेत. या अकॅडमी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांशी (colleges) 'टायअप' करून विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. शासन अशा महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात अनुदान देत असताना, महाविद्यालये खासगी क्लासेससोबत हातमिळवणी करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी वसूल करतात.

या प्रकारामुळे गरीब आणि सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बसता येत नाही. दुसरीकडे, शासनाची ७५% उपस्थितीची अट डावलून अनुदानाचा गैरवापर केला जात आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे.

शाहू सेनेचा आक्रमक इशारा:

"या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा टायअप केलेल्या कोचिंग माफियांच्या अकॅडमी आणि संबंधित महाविद्यालयांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी केली आहे. तसेच, जर प्रशासनाने यावर तातडीने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तर शाहू सेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व संबंधित कोचिंग क्लासेसला टाळे ठोकण्यात येईल!"

निवेदनाच्या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:
सौ. चंदा बेलेकर (उपाध्यक्ष) रोनक पोवार करण कवठेकर अभिजित शिंदे तन्मय हिंदूळे विवेक पोर्लेकर अजय शिंगे अन्सर मगेरी पांडुरंग पंगम रंजित पाटील विराज पाटील सुमित पोवार प्रतिक पाटील अनिकेत कोंडुस्कर जीवन राटे
थोडे नवीन जरा जुने