BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

श्री शिवाजी तरुण मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश: संकेत साळोखेची दुसरी हॅटट्रिक

महापौर चषक - श्री शिवाजी तरुण मंडळ विजयी
LIVE: कोल्हापूर फुटबॉल

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा

श्री शिवाजी तरुण मंडळाचा उत्तरेश्वर संघावर दणदणीत विजय!

श्री शिवाजी तरुण मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश: संकेत साळोखेची दुसरी हॅटट्रिक

कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात अटीतटीचा सामना रंगला.


सामन्याचा थरार (पहिला हाफ)

  • ५ वे मिनिट: दर्शन पाटीलच्या पासवर संकेत साळोखेने पहिला गोल करत शिवाजी संघाला १-० ची आघाडी मिळवून दिली.
  • ६ वे मिनिट: उत्तरेश्वरच्या इलेनसा शर्माने फ्री किकवर गोल करत सामना १-१ च्या बरोबरीत आणला.
  • ११ वे मिनिट: हर्ष जरगच्या पासवर पुन्हा संकेत साळोखेने गोल केला. मध्यंतरापर्यंत शिवाजी तरुण मंडळ २-१ ने आघाडीवर होते.

सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर संकेत साळोखेने अचूक गोल केला आणि या स्पर्धेतील आपली दुसरी हॅटट्रिक साजरी केली!

उत्तरार्धात उत्तरेश्वर संघाच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी जोरदार चढाया केल्या, मात्र शिवाजी मंडळाच्या भक्कम बचावफळीमुळे त्यांना यश आले नाही. अखेर श्री शिवाजी तरुण मंडळाने हा सामना ३-१ अशा फरकाने जिंकत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली.

श्री शिवाजी संघ - उत्कृष्ट खेळ:

संकेत जरग, विशाल पाटील, इंद्रजीत चौगुले, करण चव्हाण बंदरे, योगेश कदम.

उत्तरेश्वर संघ - उत्कृष्ट खेळ:

तेजस वालके, अथर्व पाटील, मयूर कदम, तुषार पुनाळकर, विश्वजित भोसले.

थोडे नवीन जरा जुने