शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का?
'आप'चा आयुक्तांच्या बैठकीत थेट सवाल; विविध प्रश्नांवर मांडली भूमिका
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याशी चर्चा
शहरातील विविध प्रश्नांवर आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला शंभर कोटी रस्ते प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नसून, गटार चॅनेल टाकणे, सील कोट मारणे ही कामे अद्याप झाली नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रमुख मागण्या आणि मुद्दे:
- भरती प्रक्रिया: रिक्त पदांमुळे सेवा देण्यास येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरविकास विभाग आणि अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठपुरावा करावा.
- टिप्पर घोटाळा: कंत्राटातील घोटाळ्याची चौकशी पूर्ण करा आणि दोषी कंपन्यांना नवीन टेंडरमध्ये काम देऊ नका.
- डॉग शेल्टर: केवळ चर्चा नको, अंमलबजावणी करा. नसबंदीसाठी अधिक डॉक्टरांची नेमणूक करा.
- हवा प्रदूषण: १८ कोटी खर्च होऊनही सुधारणा नाही; 'ट्रक माऊंटेड स्विपिंग मशीन' त्वरित खरेदी करा.
- पाणी गळती: गळती शोधण्यासाठी विशेष 'टास्क फोर्स' नेमून दरमहा आढावा घ्यावा.
- ई-गव्हर्नन्स: ब्युरो, विभागीय आणि पवडी विभागात ई-गव्हर्नन्स प्रणाली अनिवार्य करा.
इतर महत्त्वाचे मुद्दे
• मालमत्ता रिविजन सर्वे पूर्ण करून कर कक्षेतील मिळकती वाढवा.
• ई-बस खरेदी प्रक्रियेला गती द्या.
• शाळा आणि वर्कशॉपमधील स्क्रॅप साहित्याची विल्हेवाट लावा.
उपस्थित मान्यवर:
संदीप देसाई (प्रदेश संघटन सचिव), उत्तम पाटील (शहराध्यक्ष), अभिजित कांबळे (महासचिव), सूरज सुर्वे, संजय नलवडे, शिवानी गजबर, दुष्यंत माने, विजय हेगडे, राकेश गायकवाड, मयूर भोसले, इस्थेर कांबळे.
