BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

दररोजचा पाणीपुरवठा पूर्ववत; मात्र वेळेत अर्धा तास कपात

कोल्हापूर पाणीपुरवठा अपडेट
कोल्हापूर | सोमवार, 04 मे 2026 LATEST NEWS

दररोजचा पाणीपुरवठा पूर्ववत; मात्र वेळेत अर्धा तास कपात

कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरण येथील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, तसेच एल निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्यासाठी महानगरपालिकेने मंगळवार दि. 5 मे 2026 पासून पाणीपुरवठ्याबाबत नव्याने नियोजन केले आहे.

महानगरपालिकेकडून यापूर्वी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला तसेच चंबुखडी बैठी टाकी येथून वितरण होणाऱ्या भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या नियोजनाची चाचणी घेतल्यानंतर मुख्य वितरण नलिका पूर्णपणे रिकाम्या राहत असल्याने त्या पुन्हा भरण्यास विलंब होत होता.

परिणामी नियोजित वेळापत्रकानुसार दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी व लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत आज लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार शहर तसेच सलग्न उपनगरांमध्ये मंगळवार, दिनांक 5 मे 2026 पासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

महत्त्वाची बदल: निर्धारीत वेळेत अर्धा तास कपात करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. भविष्यात उपलब्ध पाणीसाठा, उन्हाळ्याचा कालावधी तसेच पावसाळा लांबल्यास आवश्यकतेनुसार अर्धा तासापेक्षा अधिक वेळ कपात करून दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल न्यूज कट्टा - कोल्हापूर अपडेट्स

थोडे नवीन जरा जुने