BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

वेताळमाळ तालीम मंडळाने कोरले महापौर चषकावर नाव

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा अंतिम सामना | डिजिटल Newss कट्टा
महापौर चषक फुटबॉल स्पर्धा - अंतिम सामना

वेताळमाळ तालीम मंडळाने कोरले महापौर चषकावर नाव!

छत्रपती शाहू स्टेडियम, कोल्हापूर

श्री शिवाजी तरुण मंडळ
उपविजेता
0 (2)
VS
0 (4)
टायब्रेकरवर निर्णय
वेताळमाळ तालीम मंडळ
विजेता (४-२)

सामन्याचा थरार: सविस्तर वृत्त

कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगला. श्री शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात झालेला हा सामना अत्यंत चुरशीचा आणि रंगतदार ठरला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे अखेर सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर घेण्यात आला. यात वेताळमाळ तालीम मंडळाने 4-2 अशा फरकाने विजय मिळवत महापौर चषकावर आपले नाव कोरले.


पूर्वार्ध आणि उत्तरार्ध खेळ

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. मात्र बचावफळीच्या भक्कम कामगिरीमुळे कोणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला.

उत्तरार्धातही दोन्ही संघांकडून वेगवान चढाया करण्यात आल्या. शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंना काही चांगल्या संधी मिळाल्या, मात्र त्या गोलमध्ये रूपांतरित करण्यात अपयश आले.

टायब्रेकर अचूकता

वेताळमाळ गोलकर्ते:
  • शोएब बागवान
  • जय कामत
  • प्रणव कणसे
  • रेहान मुजावर
शिवाजी तरुण मंडळ गोलकर्ते:
  • सूर्यप्रकाश सासणे (गोल)
  • रोहन आडनाईक (गोल)
  • संकेत अनिल साळोखे (अपयशी)
  • दर्शन पाटील (अपयशी)

बक्षीस वितरण आणि बहुमान

विजेता संघ: वेताळमाळ तालीम

₹ १,५०,०००/- रोख

भव्य महापौर चषक व सन्मानपत्र

उपविजेता संघ: श्री शिवाजी तरुण मंडळ

₹ ७५,०००/- रोख

उपविजेता चषक व सन्मानपत्र

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार

पुरस्कार श्रेणी खेळाडूचे नाव संघाचे नाव बक्षीस रक्कम
सर्वोत्तम खेळाडू (मालिकावीर) विशाल कुरणे वेताळमाळ तालीम मंडळ ₹ २०,००0/- रोख
उत्कृष्ट हाफ संदेश कासार वेताळमाळ तालीम मंडळ ₹ १०,००0/- रोख
उत्कृष्ट फॉरवर्ड संकेत नितीन साळोखे श्री शिवाजी तरुण मंडळ ₹ ۱۰,۰۰0/- रोख
उत्कृष्ट डिफेन्स ऋतुराज सूर्यवंशी वेताळमाळ तालीम मंडळ ₹ १०,००0/- रोख
उत्कृष्ट गोलकीपर मयुरेश चौगुले श्री शिवाजी तरुण मंडळ ₹ १०,००0/- रोख

उपस्थित प्रमुख मान्यवर व अधिकारी

हस्ते बक्षीस वितरण:

खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, मधुरीमाराजे छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर.

महानगरपालिका पदाधिकारी व अधिकारी:

अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरण धनवाडे, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक संजय मोहिते, विजयसिंह खाडे पाटील तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि कोल्हापूरचे फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल Newss कट्टा

पत्रकार अजय शिंगे | कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ

© 2026 सर्व हक्क सुरक्षित. | Developed with Bootstrap Animations
थोडे नवीन जरा जुने