BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट कारवाईचा इशारा

कोल्हापूर, ६ मे २०२६

महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या **अमृत १ व अमृत २** अंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा आज आयुक्त **डॉ. राजेंद्र भारुड** यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी अमृत १ योजनेअंतर्गत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या.

⚠️ ब्लॅकलिस्टचा इशारा:
ठेकेदारांनी मायक्रो प्लॅनिंग करून संभाव्य काम पूर्णत्वाच्या तारखांसह नियोजन सादर करावे, अन्यथा ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा आयुक्तांनी दिला आहे. सोमवारपासून सर्व कामे सुरू झाली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
💧 पाणीपुरवठा (अमृत १)
  • • १२ पैकी ९ टाक्यांतून पाणीपुरवठा सुरू.
  • • उर्वरित ३ टाक्यांचे टेस्टिंग सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश.
  • • कळंबा फिल्टर हाऊस संप दुरुस्ती व रोड रिस्टोरेशन तातडीने करा.
  • • जुन्या ५ पैकी ४ टाक्यांची दुरुस्ती पूर्ण, १ टाकी तातडीने पूर्ण करा.
🚜 मलनिस्सारण योजना
  • • ७८ कि.मी. ड्रेनेज लाईनपैकी ६८ कि.मी. काम पूर्ण.
  • • अडथळे नसलेल्या ठिकाणी तात्काळ कामे सुरू करा.
  • • २०१० ची मुदत संपूनही कामे अपूर्ण असल्याबद्दल आयुक्तांनी विचारली कारणे.
  • • विद्युत खांब स्थलांतर व खाजगी जागांचे प्रश्न मार्गी लावा.

प्रशासकांकडून नाराजी व्यक्त

योजनेतील प्रलंबीत कामाबाबत प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली असून सोमवारपासून प्रत्येक कामासाठी स्वतंत्र पथके, वाढीव मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरण्याचे निर्देश दिले आहेत. कामाचा आढावा पुन्हा एका महिन्यानंतर घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला उपस्थित अधिकारी:

अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुरेश पाटील, प्रज्ञा गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मुरलीधर भोसले, सहाय्यक अभियंता योगेश उलपे, दास ऑफ शोर लिमिटेड मुंबईचे प्रतिनिधी इनामदार, कुलकर्णी, नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी मदने व शेट्टी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने